Home स्टोरी केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

88

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

शाळा सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद- आ. वैभव नाईक

आकर्षक रंगरंगोटीमुळे शाळेला लाभली नवी झळाळी

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फ माणगाव या शाळेचा ७५ वर्षपूर्तीनिमित्त अमृत महोत्सव सोहळा व माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, समस्त पालक, ग्रामस्थ स्नेहमेळावा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते प्रवेशद्वार व स्वछतागृह इमारतीचे उदघाटन व माजी शिक्षक,देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. विविध चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

 

यावेळी बोलताना आ. वैभव नाईक म्हणाले, केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेला ७५ वर्षे पूर्ण होणे हि सर्वांनाच अभिमानाची बाब आहे.तेव्हाच्या खडतर परिस्थिती ग्रामस्थांनी हि शाळा स्थापन केली.त्यामुळे अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले आहेत. आपली शाळा सुंदर बनविण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आकर्षक रंगरंगोटी व विविध सोयीसुविधा केलेली जिल्ह्यात अशी कुठलीही शाळा नाहीय. अशा शब्दात शुभेच्छा देत, शाळेसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी देखील शाळेप्रती व ग्रामस्थांप्रती गौरवोद्गार काढत शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी वित्त विभागाचे अव्वर सचिव अरुण परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी पंचायत समिती सदस्य गुरू सडवेलकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद नाईक, मुख्याध्यापक संजय गवस, विलास परब,सरपंच श्रिया ठाकूर,डॉ चुबे, गावडे गुरूजी, सावंत गुरुजी,गरुड गुरूजी,सडवेलकर गुरुजी, महाडेश्वर गुरुजी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष गोपाळ परब, पप्पु परब, संतोष परब, सचिन ठाकूर, अशोक परब, अंकुश जाधव, सोमा परब, लक्ष्मण लिंगवे,बाबू ठाकूर,सागर परब, बाबाजी भोई, डॉ दादा परब आदी मान्यवर मंडळी व ग्रामस्थ आणि शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.