Home स्टोरी केंद्रीय मंत्री नारायण राणेनकडून जिल्ह्यातील डी एड धारकांची क्रूर चेष्टा…! युवासेना तालुकाप्रमुख...

केंद्रीय मंत्री नारायण राणेनकडून जिल्ह्यातील डी एड धारकांची क्रूर चेष्टा…! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

220

नवीन शिक्षक भरती होणार असेल तर ३.५ महिन्यांची कंत्राटी भरती चा घाट कशासाठी? युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी.

 

सिंधुदुर्ग: राणेंनी महाराष्ट्र शासन कडून अपात्र आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले होते कि तुमचा प्रश्न मी सोडवणार. डी. एड. वाल्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी ही एक राजकीय खेळी होती,आता त्या अपात्र उमेदवारांच्या पदरात शुद्ध फसवणूक ३.५ महिन्याची कंत्राटी भरती, ती सुद्धा त्या गावातील शाळा व्यवस्थापन समिती करणार ज्या समितीला काहीच अधिकार नाही. परिपत्रकात सीईओ यांनी शासनाची पळवाट आधीच तयार ठेवलीय,की या नियुक्तीचा जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याशी संबंध नाही. उद्या नियमित होण्यासाठी कुठेही दाद मागता येणार नाही. किव्हा कोर्टात जाता येणार नाही. असे बाँड पेपर वर लिहून घेत आचारसंहिता पर्यंत झुलवत ठेऊन आम्ही भरती केली असे दाखवून जिल्ह्यातील उमेदवारांना आणि जिल्हा वासियांना इलेक्शन स्टंट करत क्रेडिट घेण्याचे अतिशय घाणेरडे राजकारण केले. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.

 

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी पुढे म्हणाले की, उद्या ३.५ महिन्यानंतर या नियुक्त्या समाप्त होतील त्या नंतर हातचा रोजगार सोडून आशेने हजर झालेल्यांचे एप्रिल नंतर भविष्य काय? १२ वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची क्रूर चेष्टा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. ही कंत्राटी भरती करायचीच होती तर ७-८ महिन्यांपूर्वी भरती का केली नाही ? जिल्हातील बऱ्याच मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले याला जबाबदार CEO आहेत त्यांच्या विरोधात न्यायालयात अथवा त्यांच्या वरिष्ठाकडे दाद मागणार आतां खासदरकिसाठी स्वतः आणि आमदारकीसाठी त्यांची २ मुलं उभी राहतील मंत्री असताना जिल्ह्यातील युवावर्गांवर अन्याय त्यांना आश्वासने देऊन नंतर पलटी मारणे, दादागिरी हे आता जिल्हातील लोकांनी ओळखलं आहे या सत्ता धाऱ्यांना सिंधुदुर्ग मधील जनता घरचा रस्ता दाखवेल. डी. एड. धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याआधी देखील युवासेनेने त्यांची बाजू उचलून धरत आंदोलन केले होते, जिल्हातील युवावर्गांवर अन्याय होऊ देणार नाही.