Home स्टोरी कुठल्याही मोठ्या नेत्याला त्रंबकेश्वरला बोलावणार नाही! पुरुषोत्तम कडलग….

कुठल्याही मोठ्या नेत्याला त्रंबकेश्वरला बोलावणार नाही! पुरुषोत्तम कडलग….

88

१८ मे वार्ता: त्र्यंबकेश्वर मंदिरात महादेवाला चादर घालण्यासाठी मुस्लिम आणि प्रयत्न केला होता. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांनी अडवलं. अशी माहिती मिळते. याविरोधात आता त्र्यंबकेश्वर मध्ये आंदोलनासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून हिंदू संघटनांचे पदाधिकारी आले होते. ही घडलेली घटना त्र्यंबकेश्वर गावतील असून याबाबतचे सर्व निर्णय आता ग्रामस्थ गाव पातळीवर घेतला जाईल असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

मात्र या संपूर्ण प्रकरणात बाहेरून कुठलेही व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करू दिला जाणार नाही असाही निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी माहिती दिली आहे. याला राजकीय किंवा जातीवाद वळण लागावं नाही म्हणून आम्ही गावकरी हे वरिष्ठ नेत्यांशी भेटणार आहोत. याला अजून राजकीय वळण लागायला नको म्हणून कुठल्याही मोठ्या नेत्याला त्रंबकेश्वरला बोलावणार नाही. फक्त त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करणार आहोत. असं या वेळी कडलग यांनी सांगितलं आहे.