Home स्टोरी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, राज्य सरकारचा धान्य खरेदीचा निर्णय

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, राज्य सरकारचा धान्य खरेदीचा निर्णय

152

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भात (धान) व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. यावेळी आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

त्यानुसार राज्यात खरेदी केंद्र सुरू करून त्या ठिकाणी धानाची व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरड धान्याची खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

या योजनेंतर्गत भात सर्वसाधारण (एफएक्यू) २ हजार १८३ रुपये, अ दर्जा २ हजार २०३ रुपये, ज्वारी (संकरित) ३ हजार १८०, ज्वारी (मालदांडी) ३ हजार २२५, बाजरी २ हजार ५००, मका २ हजार ०९०, रागी ३ हजार ८४६ रुपये याप्रमाणे आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार आहे.

 

खरीप पणन हंगामात धान ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदी कालावधी असणार आहे, तर भरडधान्य १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदीचा कालावधी असणार आहे.