सावंतवाडी प्रतिनिधी: कणकवली कोळोशी येथे एका पोलीस कर्मचाऱ्यांचा खून झाल्याची घटना समोर घडली आहे. हा खून अनैसर्गिक संबंधातून झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू असतांना आणि या प्रकरणाने पूर्ण जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात खळबळ उडाली असतांनाच सावंतवाडीतील माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी सत्यार्थ या youtube चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमुळे सावंतवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक सुनील पेडणेकर म्हणाले की, कणकवलीतील हा विषय जरी असला तरी सावंतवाडीतून एका वृत्तपत्रामध्ये काम करणारा एक कर्मचारी ज्याने आज स्वतःचं चॅनल घातलं त्याच्याकडून ही सुरुवात आहे. माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्या अशा वक्तव्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कदाचित बदलणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संस्थानिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहरातून आणि लोकसभेच्या चौथ्या स्तंभात काम करणाऱ्या पत्रकाराशी कणकवली तालुक्यातील काळोशी गावातील खून प्रकरणाचा संबंध जोडला गेल्याने सावंतवाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एका पत्रकारानेच माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी मुलाखतीतून सावंतवाडीतील एका पत्रकराचे नाव न घेता कोळोशी खून प्रकरणी दिलेली मुलाखत प्रसारित केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील एखाद्या पत्रकाराचा कणकवली तालुक्यातील काळोशी गावातील अनैतिक खून प्रकरणाशी संबंध असणे म्हणजे पत्रकारितेला लाजिरवाणी अशी बाब आहे. मात्र हे कितपत सत्य असेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे.
आता माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी कोळोशी खून प्रकरणाशी संबंध जोडलेला नेमका हा पत्रकार कोण? या पत्रकाराचा कोणत्या संघटनेची संबंध आहे? या पत्रकाराला कोणत्या संघटनेची साथ आहे? खरंच काळोशी अनैसर्गिक खून प्रकरणाशी या पत्रकाराचा काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता जिल्हा पत्रकार संघटनेचे तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघटनेचे पत्रकार आणि संघटनेचे पदाधिकारी यावर नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच आता सुनील पेडणेकर यांच्या चिरफाड या सोशल मिडीयावर चॅनलवर नेमक्या कोणत्या पोस्ट प्रसारित झाल्या होत्या, याकडे सुद्धा आता अनेकांचे लक्ष लागलं आहे. मात्र असा पत्रकार जर सावंतवाडी तालुक्यात वावरत असेल तर अशा पत्रकारावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा सुरु आहे.
माजी नगरसेवक आणि अभ्यासक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सुनील पेडणेकर यांनी सत्यार्थ youtube चॅनल वर दिलेल्या मुलाखतीमुळे आता कोळोशी अनैसर्गिक हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागणार की काय? तसेच सावंतवाडी तालुक्यातील पोलीस सावंतवाडीतील त्या पत्रकाराची कोणत्या प्रकारे चौकशी करणार? माजी नगरसेवक सुनील पेडणेकर काळोशी येथील अनैसर्गिक खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत करतील काय? अर्थातच ज्या पत्रकारामुळे ही सुरुवात झाली आहे त्या पत्रकाराचे नाव माजी नगरसेवक सुनील पेडणेकर पोलिसांना सांगतील काय? असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. तसेच जिल्हा पोलीस सुनील पेडणेकर यांच्या या मुलाखतीचा विचार करून काळोशी येथील खून प्रकरणाचा योग्य तो तपास करतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.