Home स्टोरी कारीवडे पेडवेवाडी येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

कारीवडे पेडवेवाडी येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

125

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे पेडवेवाडी येथील श्री देव हेळेकर युवक मंडळाकडून दि. ०२ ते ०६ मे या कालावधीत पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवेवाडी नं. ०२ च्या रंगमंचावर भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व नाट्य रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गोविंद परब व माजी अध्यक्ष महादेव माळकर यांनी केले आहे.या नाट्य महोत्सवाला मंगळवार दिनांक ०२ मे रोजी सायंकाळी सात वाजता सुरुवात होणार असून पहिला नाट्यप्रयोग सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरा या मंडळाचा “मलय गंधिनी” या नाट्यप्रयोगाने होणार आहे. बुधवार दिनांक ०३ मे रोजी सायंकाळी सात वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा “शापमुक्त” हा नाट्यप्रयोग, होणार असून, गुरुवार दिनांक ०४ मे रोजी सायंकाळी सात वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळ आजगांव यांचा “शिर मारिले आईचे” हा नाट्यप्रयोग होणार आहे,तर शुक्रवार दिनांक ०५ मे २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड यांचा “शापित घुबड”हा नाट्य प्रयोग होणार आहे. शेवटच्या दिवशी शनिवारी सहा मे रोजी सायंकाळी सात वाजता बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा दणदणीत “देव भक्तीला भुकेला” या नाट्यप्रयोगाने या दशावतार महोत्सवाची सांगता होणार आहे. अशी माहिती महादेव माळकर यांनी दिली आहे.