Home स्टोरी कारिवडे येथे आयोजित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी...

कारिवडे येथे आयोजित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ प्रथम.

25

सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ (बुवा सचिन सावंत) याने प्रथम क्रमांक पटकाविला. या चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत घोटगे येथील श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ( बुवा हर्षद ढवळ) यांनी द्वितिय क्रमांक, न्हावेली येथील श्री देवी भवानी प्रासादिक भजन मडळ (बुवा अक्षय जाधव) याने तृतीय क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी वरवडे येथील दिर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ (बुवा अवधुत मेस्त्री) यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीप्रमाणे..!

गजर सादरीकरण आणि उत्कृष्ट कोरस श्री गणेश भजन मंडळ माजगाव (बुवा कुणाल वारंग), उत्कृष्ट गायक सचिन सावंत (श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ मातोंड), उत्कृष्ट हार्मोनियम वादक कु. अवधुत मेस्त्री (दिर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ वरवडे), उत्कृष्ट पखवाजवादक कु. प्रथमेश राणे (श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोटगे), उत्कृष्ट तबलावादक कु. अमन सातार्डेकर (गणेश भजन मंडळ माजगाव), उत्कृष्ट झांज वादक कु अक्षय गावडे (श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ न्हावेली).

माघी गणेश जयंती निमित्त पेडवेवाडी शाळा नं २ येथे झालेल्या या चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. या भजन स्पर्धेचे परिक्षक म्हणुन संगीत विशारद, वैभव परब आणि पखवाज अलंकार प्रशांत सरनोबत यांनी काम पाहिले.

भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७००१ रुपये, ५००१ रूपये, ३००१ रूपये, तर उत्तेजनार्थ भजन मंडळाला २००१ रूपयाचे पारितोषिक व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच भजन स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, पखवाज वादक, तबला वादक, झांज वादक, कोरस, गजर यांनाही रोख रकमेसह सर्व सहभागी भजन मंडळांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भजन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण पूर्वी या भजन स्पर्धेच्या तज्ञ परिक्षकांच्या सादरीकरणाने भजन रसिक मंत्रमुक्त झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवि तथा बांदा पानवळ प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोहर परब यांनी केले.