Home स्टोरी कारिवडे येथिल श्री देवी कालिका मंदिरात दि.२२ जानेवारी दिवशी श्री राम आनंदोत्सव...

कारिवडे येथिल श्री देवी कालिका मंदिरात दि.२२ जानेवारी दिवशी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार…!

119

सावंतवाडी: भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी कारिवडे येथिल श्री देवी कालिका मंदिरात दि.२२ जानेवारी दिवशी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आल्याची माहीती येथील मानकरी बाबा गावकर आणि दादा गावकर यांनी दिली यांनी दिली.

सोमवार दि.२२ दिवशी श्री देवी कालिका मंदिरात सकाळी नित्यपुजा होऊन प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पुजन होईल. सकाळी ९ वाजल्या पासून नामस्मरण (श्रीराम जय जय राम जयजय राम ) व घंटानाद होईल. दुपारी १ वाजता ग्राम पंचायत कारिवडे यांच्या वतीने महाप्रआसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता ह. भ. प संजय लक्ष्मण चारी यांचे मर्यादा पुरुषोतम भगवान श्री राम यांच्या गुण वैशिष्ट आधारित कीर्तन होईल

त्यानंतर रात्री १० नंतर कारिवडे ग्रामस्थ यांचे भजन होईल . या कार्यक्रमात सर्व भजनकर्मी, ,ग्रामस्थ व रामभक्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन येथील मानकरी, मंदिर उप समिती , आणि ग्राम पंचायत कारिवडे, यांच्या वतीने करण्यात आले आहे,