Home स्टोरी कारिवडे भैरववाडी येथील सुभेदार सुनील राघोबा सावंत पंजाब येथे शहीद.

कारिवडे भैरववाडी येथील सुभेदार सुनील राघोबा सावंत पंजाब येथे शहीद.

248

सावंतवाडी: तालुक्यातील कारिवडे भैरववाडी येथील १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार सुनील राघोबा सावंत हे बुधवारी सकाळी पिटी परेडदरम्यान पंजाब येथे शहीद झाले. त्यांचे पार्थिव दोन दिवसात पंजाब येथून गावी आणण्यात येणार आहे. या घटनेने कारिवडे गावावर शोककळा पसरली आहे.

नेहमीप्रमाणे पंजाब येथे त्यांच्या युनिटमधील जवानांची परेड सुरू होती. त्यावेळी धावताना सुभेदार सावंत चक्कर येऊन खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पंजाब १९ मराठा युनिटमधून सावंत यांच्या घरी कारिवडे भैरववाडी येथे या घटनेची कल्पना देण्यात आली आहे. सुभेदार सुनील सावंत हे गेल्याच महिन्यात एक महिन्याच्या सुट्टीवर येऊन ३० ऑगस्टला पुन्हा पंजाब येथे ड्यूटीवर गेले होते

सैन्यदलात त्यांची २६ वर्षे सेवा झाली पूर्ण आहेत. कारिवडे गावात त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सैन्य दलात मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांचे वडील राघोबा सावंत हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव पंजाब येथून मूळ गावी दोन दिवसात आणले जाणार आहे, असे रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे गवळी यांनी सांगितले