Home राजकारण काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो! पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो! पंतप्रधान मोदी

64

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांना ‘विषारी साप’ अशी उपमा दिली होती. या मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याला बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील जाहीर सभेत मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने माझ्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांची यादी कोणी तरी मला पाठवली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा माझ्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ अभियान चालविले होते. नंतर ते म्हणाले, ‘मोदी चोर है’ नंतर पुन्हा म्हणाले ‘ओबीसी समुदाय चोर है’. आता कर्नाटकात प्रचार सुरू होताच काँग्रेसने माझ्या लिंगायत बंधू-भगिनींना अपमानित केले आहे. मात्र, अपशब्दाला मतांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्णय कर्नाटकाच्या जनतेने घेतला आहे. मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंबद्दलही अपशब्द वापरले होते. आपण आजही पाहतो आहोत की, काँग्रेस सावरकरांबद्दलही अपशब्द वापरत आहे. काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.