कसबा पोटनिवडणूकीच्या सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप या सध्या आघाडीवर आहेत.कसबा पेठ निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?….कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला काही हरकत नाही. एका चांगल्या बदलाची सुरूवात आहे. भाजपाच्या विरोधातली मतांची संख्या वाढते आहे. मतदार जागरूक होत चालले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र राहणं आणि कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे….वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे. हे मी बोललो होतो. तेच पुण्यात झालं. शिवसेनेचाही वापर करून फेकला. मुक्ता टिळक यांच्या घरातही तिकिट दिलं गेलं नाही. त्यामुळे वापरा आणि फेका हेच समोर आलं. गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून प्रचाराला आणलं. सहानुभूती पाहिजे पण ती पण सिलेक्टिव्ह हवी हे मतदार कधी स्वीकारत नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.