सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज् युकेशन सोसायटी, संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेचा इयत्ता नववी ब मधील विद्यार्थी कुमार अनंत अभिजीत चिंचकर, 58 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन, सिंधुदुर्गचा छात्र सैनिक याची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्थळ सैनिक कॅम्प साठी निवड झाली होती, हे आपण सर्व सिंधुदुर्ग वासियांना माहितीच आहे. हे आपल्या सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सार्जंट अनंत ने सुवर्णपदकावरती स्नॅप शूटिंग या प्रकारात आपले नाव कोरले असून या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून विविध राज्यातील जवळपास 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते. यामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी आपल्या कळसुलकर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सार्जट अनंत अभिजीत चिंचकर ठरला आहे. सार्जेंट अनंत चे खूप-खूप अभिनंदन.
दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून या सराव शिबिरामध्ये सातत्याने अव्वल कामगिरी दाखवत अनंतने मजल दरमजल करत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती अशा विविध ठिकाणी सराव शिबिरामध्ये गुणवत्तापूर्ण प्रदर्शन करून सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीला अंतिम सामन्यांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. “स्नॅप शूटिंग” या रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग यश प्राप्त करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलला आहे. सार्जंट अनंत याला ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज डी मंडलिक प्रशालेचे एन.सी.सी.विभाग प्रमुख तथा फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
अनंतला संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर, संस्थेचे संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे, पर्यवेक्षक श्री एस.एस.वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर वृंद, पालक वर्ग, प्रशालेचे हितचिंतक यांकडून सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर चे हार्दिक अभिनंदन व भरभरून कौतुक करण्यात येत आहे.







