सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु.निधी विजय खडपकर या विद्यार्थिनीने अल्पावधीतच नृत्य क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात जास्तीत जास्त स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेत यशस्वी होण्याची परंपरा कु.निधीने कायम ठेवली आहे. विशेष करून लावणी या नृत्य प्रकारात तिने हे उल्लेखनीय यश मिळवलं आहे. निधीला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. अर्थात तिला मोलाचं सहकार्य मिळालं ते तिचे वडील श्री विजय खडपकर यांचे, त्याचबरोबर तिचे गुरू श्री.तुलसीदास आर्लेकर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळविले आहे.
कुमारी निधीच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, संस्थेचे पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, शिक्षक वृंद, चतुर्थ कर्मचारी,पालक यांच्या वतीने निधीचे विशेष कौतुक करण्यात आले.