स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या सुचना!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील आंबेडकरवादी जनतेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या प्रभाग ड कार्यालयासमोरील निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पहाणी करून होत असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करीत स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सुचना संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तद्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान लोकप्रिय मुख्यमत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते दि. १२ एप्रिल २०२२ रोजी भूमिपूजन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने निर्माण होत असलेल्या या भव्य स्मारकाच्या कामाची पहाणी करण्यात यावी अशी विनंती स्मारक समितीचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना केली होती. त्यानुसार मंगळवारी आयुक्त दांगडे यांनी संबंधीत अधिकार्यांसह निर्माणाधीन स्मारकाच्या जागेवर प्रत्यक्ष भेट देवून कामाची माहीती करून घेतली,. तसेच झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करीत उर्वरीत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

या समयी कार्यकारी अभियंते श्री कोरे, प्रकल्प अधिकारी श्री शशीम केदार, प्रभाग ड चे सहाय्यक आयुक्त भरत पाटील, स्मारक समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.