Home स्टोरी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेवा निवृत्त सेवकांचा एस. सी. एस टी बहुजन कर्मचारी...

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेवा निवृत्त सेवकांचा एस. सी. एस टी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार!

164

कल्याण प्रतिनिधी: आनंद गायकवाड:

कल्याण डोंबिवली महापालिकेतील विविध पदावर कार्यरत असेलेले ५० हून अधिक कर्मचारी ३१ मे २०२३ रोजी सेवा निवृत्त झाले. या कर्मचार्‍यांचा एसी. सी. एस. टी. बहुजन कर्मचारी संघटनेच्या जाहीर सत्कार करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगर पालीकेत ३१मे २०२३ रोजी एसी सी,एस टी बहूजन कर्मचारी संघटनेच्या वतिने निवृत कर्मचारी भरत खरे यांचे सह अनेक सेवा निवृत्त होत असलेल्या कर्मचार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी माजी महापौर रमेश जाधव यांनी या सत्कार समारोह समयी आपल्या भाषणात सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील ८०% कर्मचारीवर्ग ईमाने ईतबारे आपले कर्तव्य पार पाडत असतो, हे सेवक नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम करीत असतात, मालमत्ता कर, तसेच पाणी बिलाच्या वसुलीचे काम मोठ्या जिकीरीचे असते वसूलीचे ईष्टांग गाठण्यासाठी हे कर्मचारी आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्या प्रती स्वःताला झोकून देत असतात . परंतू वरिष्ठांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत नाही याची खंत वाटते या बाबीकडे प्रशासनाने गार्भियाने लक्ष देण्याची गरज आहे. महापौर असतांना महासभेत सर्व संमतिने थकीत देणी देण्यात यावी या साठी ठराव मंजूर केला होता,त्याची अंमलबजावणी देखील होत नाही .सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारे खचून न जाता आपल्या कुटुंबातील व्यक्तिंना वेळ ध्यावा असेही त्यांनी सांगितले . ३१ मे रोजी महापालिकेच्या विविध खात्यातील ५० कर्मचारी सेवानिवृत्त झाली. या प्रंसगी सहायक आयुक्त श्री सोनवणे, चंद्रकांत पोळ, सौ,ला. रेखा पाटील, समाधान मोरे, भूषण कोंकणे आदी मान्यवर उपस्थित होते.