Home स्टोरी कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचक प्रेरणा दिन साजरा….

कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचक प्रेरणा दिन साजरा….

298

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा  करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्या वाचण्याची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थी लिहिते बोलते व्हावेत यासाठी कलंबिस्त हायस्कूल मधील १६५ विद्यार्थ्यांना वही पेन व शैक्षणिक साहित्य  तसेच खुर्च्या भेटवस्तू  देण्यात आल्या. माजी पं. समिती सदस्य व कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे संचालक  श्री. रमेश सावंत यांनी हे साहित्य वाटप केले.. भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त इंग्लिश स्कूल मध्ये वाचन प्रेरणा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ‘पाठ्य उतारा वाचन उपक्रमात’ प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी ज्ञानमंदिर वाचनालयाचे चे संचालक श्री.रमेश दाजी सावंत यांनी प्रशालेतील १६५ विद्यार्थ्यांना वही व पेन असे शालोपयोगी साहित्य वितरण केले. त्याचप्रमाणे प्रशालेला चार खुर्च्या भेट दिल्या. त्याबद्दल मुख्याध्यापक श्री. अभिजीत जाधव यांनी त्यांचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा दिन आज आगळ्यावेगळ्या पद्धतीत साजरा झाला असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. शरद सावंत व ज्येष्ठ लिपिक श्री. विष्णू पास्ते यांच्या हस्ते श्री रमेश सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या दातृत्वबद्दल संस्थाध्यक्ष श्री. शिवाजी सावंत सर्व संस्था पदाधिकारी यांनी असे सहकार्य श्री सावंत यांनी करावे अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर तर आभार शिक्षिका श्रीम. विनिता कवीटकर यांनी  मानले. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री रमेश सावंत यांनी कलंबिस्त हायस्कूल व कलंबिस्त प्राथमिक शाळा या दोन्ही ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आणि समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.