Home स्टोरी कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न…!

कलंबिस्त हायस्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न…!

123

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास २०० जणांनी लाभ घेतला. यावेळी १५ जणांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. या शिबिरात डायबिटीस, बीपी, डोळे, कान, नाक व घसा आदींची तपासणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या तपासण्या केल्या. ज्यांना गंभीर आजार असतील त्यांच्या उपचाराबाबत संस्था निश्चितच पुढील पाऊल उचलेल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांनी दिले.