Home क्राईम कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले!

कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले!

226

३९ हजारांच्या गांज्यासह २ मोबाईल वजनकाटा जप्त….

कणकवली:- कणकवली गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. तर त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपी वैभव सीताराम पांगम वय (२५ वर्षे), स्वप्नील सुरेश कुडतरकर ( वय ३० वर्षे), रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली) असून यातील संशयित आरोपी रामदास पांगम हा पसार झाला आहे.