Home स्टोरी कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाङ्ममय लेखन कार्यशाळा

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाङ्ममय लेखन कार्यशाळा

142

कणकवली: येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कनक नियतकालिक विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक १४ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत जिल्हास्तरीय वाङ्ममय लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कथा, कविता, ललित, नाट्य व माध्यमांसाठीचे लेखन कौशल्य या विषयी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अशा पद्धतीची जिल्हास्तरीय वाङ्ममय लेखन कार्यशाळा कणकवली महाविद्यालयात दुसऱ्यांना आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. महाविद्यालयाचे ओळखपत्र व शिफारस पत्र घेऊन सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी पर्यंत प्रा.एस. आर.जाधव यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे व विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम यांनी केले आहे.