Home स्टोरी कट्टा येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम!

कट्टा येथे साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम!

156

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने ३८ विद्यार्थ्याना शिक्षण निधीचे वितरण….

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेसाने गुरुजींची पुण्यतिथी साजरी झाली. खरा तो एकची धर्म या प्राथनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रारंभी दीपक भोगटे यानी साने गुरुजीना अभिवादन करून सेवांगणचा शिक्षण निधी हा गरीब विधार्थ्यांसाठी उपलब्ध असून गेल्या २५ वर्षात अनेक विद्यार्थ्यानी याचा लाभ घेतला आहे. विद्याथ्यानी गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी महेंद्र महाभोज यानी आपल्या . ओघवत्या शैलीत साने गुरुजींचा जीवन पट उलगडला. साने गुरुजींच्या विचाराची आज खरी गरज असून सर्वार्थाने जगाला प्रेम अपर्ण करण्याची वेळ आली आहे.द्वेष, वैर विसरून साने गुरुजींचा समतेचाव प्रेमाचा विचार अंगीकृत करूया असे आवाहन त्यानी केले.अदिती शृंगारे यानी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कट्टा दशक्रोशीतील ३८ विद्यार्थ्याना शिक्षण निधीचे वितरण करण्यात आले. बाळकृष्ण नांदोसकर यानी सूत्रसंचलन व सुजाता पावसकर यानी आभार मानले.यावेळी सेवांगण कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर, माता यशोदा संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण हरचांदे , नंदकुमार पार्टे, डगरे मॅडम, अदिती शृंगारे, श्रीधर गोंधळी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.