Home स्टोरी एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? अजित पवार….

एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? अजित पवार….

71

राज्य सरकारने गुढी पाडवा ते आंबेडकर जयंतीपर्यंत गरिबांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. गुढी पाडव्यापासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा देणार आहेत. कसला आनंद? तुम्ही तिथे आनंद घेताय आणि आनंद शिधा… आनंद शिधा.., सुरू केलंय. देतात किती एक किलो. घरात माणसं किती पाच. एक किलो आनंदाचा शिधा यांच्या काकांनी खाल्ला होता का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. एक किलो आनंद शिधा दिला. एक किलो तेल, एक किलो साखर, रवा एक किलो आणि डाळ एक किलो. काय चार किलोने होणार माहीत नाही. तुमचं कुटुंब त्यात चालवून दाखवा. एक महिना या आनंदाच्या शिधावर घर चालवून दाखवा. चेष्टा चाललीय… मस्करी चालली आहे. तुम्हीही भारी माणसं आहात. अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

संग्रहित फोटो

तसेच अजित पवार यांनी यावेळी बोलताना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर भाष्य केलं. पक्ष बाळासाहेबांनी काढला. जाताना तो पक्ष त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात दिला. आता त्यांच्याकडून पक्षही काढून घेतला आणि चिन्हही काढून घेतलं. दिलं यांना. असं कुठं असतं का? काय करणार निवडणूक आयोगाने सांगितलं. आता जनतेने सांगितलं पाहिजे, असं सांगतानाच येत्या २ एप्रिलला संभाजीनगरला सभाा होत आहे. शक्य असेल त्यांनी स्वत:च्या खर्चाने या. आम्ही सर्वजण तिथे विचार मांडणार आहोत, असं ते म्हणाले.