Home स्टोरी उद्योजक राजन आंगणे काळाच्या पडद्याआड…!

उद्योजक राजन आंगणे काळाच्या पडद्याआड…!

331

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील क्रशर व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन आंगणे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  ते कारिवडे येथील क्रशर परिसरात असलेल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराकडून कुटीर रुग्णालयात मोठी गर्दी करण्यात आली होती.

उद्योजक राजन आंगणे सामाजिक कार्यात कायम अग्रेसर होते. सर्वसामान्यांचे ते कायम पाठिशी राहत त्यांनी उद्योजक म्हणून आपला नावलौकिक मिळवला होता. आंगणे हे मूळचे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील होते. त्यांचा सामाजिक क्षेत्रात मोठा वावर होता. उद्योजक राजन आंगणे  व्यवसायानिमित्त कारिवडे-भैरववाडी येथे स्थायिक झाले होते. तेथेच त्यांनी त्रिमूर्ती स्टोन क्रशर या नावाने उद्योग व्यवसाय उभा केला होता. तसेच बाजूला निवासस्थान होते. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.