Home स्टोरी उत्तर रेल्वे प्रशासनाने दोन मशिदींच्या व्यवस्थापनाला बाजावली नोटीस!

उत्तर रेल्वे प्रशासनाने दोन मशिदींच्या व्यवस्थापनाला बाजावली नोटीस!

141

२२ जुलै वार्ता: उत्तर रेल्वे प्रशासनाने दोन मशिदींच्या व्यवस्थापनाला नोटीस बाजावली आहे. त्यानुसार, या मशिदींचे बांधकाम अनधिकृत असून, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या या मशिदी-मजार येत्या १५ दिवसात काढावे अन्यथा रेल्वे प्रशासन कारवाई करेल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. बंगाली मार्केट आणि आयटीओ परिसरातील तकिया बब्बर शाह या दोन मशिदींना नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान, मशिद कमिटीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, या मशिदी शेकडो वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे, रेल्वेच्या जागेचा प्रश्नच येत नाही. त्यांचा हा दावा रेल्वेने खारीज केला असून, येत्या १५ दिवसात स्वेच्छेने बांधकाम हटवून जमीन मोकळी करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मात्र, मशिद समितीने याविषयी निर्णय न घेतल्यास रेल्वे प्रशासन स्वत:च कारवाई करून, मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडेल आणि त्यासाठी मशिदीचे व्यवस्थापनच जबाबदार राहील, असे संबंधित नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ मशिदच नाही तर मशिद तकिया बब्बर शाहच्या बाजूला असलेल्या एमसीडीच्या मलेरिया कार्यालयालाही रिकामे करण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने त्या कार्यालयाच्या भिंतीवर चिपकवली आहे.