Home स्टोरी आसोली गावातील वडखोल येथील गटार बांधण्याच्या कामाचे भूमी पूजन संपन्न…!

आसोली गावातील वडखोल येथील गटार बांधण्याच्या कामाचे भूमी पूजन संपन्न…!

410

आसोली प्रतिनिधी: आसोली गावातील वडखोल येथील पेणसे च्या घरापासून ते गावडेश्र्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याला गटार बांधण्याचं काम मंजूर झाले आहे. हे काम १५ वित्त मधून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमी पूजन आज रविवार दि. २१ जानेवारी रोजी आसोली गावचे सरपंच श्री. बाळा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  ग्रामपंचायत सदस्य श्री स्वप्नील गावडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रती नाईक व सौ. शीतल घाडी याही उपस्थित होते. त्याच बरोबर गावचे पोलिस पाटील श्री. निलेश पोळजी आणि वाडखोल गावातील गावकरी मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.