Home स्टोरी आसोली गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न!

आसोली गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न!

422

वेंगुर्ला: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातहि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आसोली गावात १४ ऑगस्ट रोजी रोजी अमृत महोत्सव वर्षाची सांगता कार्यक्राअंतर्गत शिलाफलकाचे अनावरण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला. गावचे सरपंच बाळा जाधव यांच्या हस्ते शीलाफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गावडे, राकेश धुरी, नेत्रा राणे, राखी धुरी, प्राजक्ता जाधव, रती नाईक, तंटा मुक्ती अध्यक्ष उदय धुरी, माजी सरपंच सुजाता देसाई, माजी उपसरपंच संजय गावडे, शाळेतील विध्यार्थी, गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वृक्षा रोपण करण्यात आले. सरपंच बाळा जाधव, गावातील ग्रामस्थ आणि विध्यार्थ्यांनी आसोली गावात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकरची झाडे लावली.
झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम आणि तोटे आज मानवला भोगावे लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. आसोली गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाडे लावून साजरा करत ग्रामस्थांनी ‘झाडे लावा झाडे जगवा‘ हा विचार गावातील विध्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला. तेव्हा तो पूर्ण उपक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त राबविण्यात आले तर देश खरंच सुजलम शुफलम होईल यात काडीमात्र शंका नाही. 

वृक्षा रोपण करतांना ग्रामस्थ आणि शाळेतील विध्यार्थी