Home स्पोर्ट आयपीएलच्या ४० व्या सामन्यात दिल्लीचा पराभव!

आयपीएलच्या ४० व्या सामन्यात दिल्लीचा पराभव!

76

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी २० षटकांत ६ बाद १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघ २० षटकांत १८८ धावा करू शकला.दरम्यान, या सामन्यात दिल्लीच्या पराभवापेक्षाही स्टेडियममधील चाहत्यांच्या राड्याने चर्चा मिळवली आहे. स्टेडियमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चाहते लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना हाणामारी करत आहेत.आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरलेले असते, दिल्लीच्या जटेली स्टेडियममध्येही असेच पाहायला मिळाले. चाहते त्यांच्या आवडत्या संघांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते, पण या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे दिसते आहे. या भांडणामागील कारण अद्याप समोर आले नाही.