Home राजकारण आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाही!...

आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाही! महादेव जानकर यांचं वक्तव्य.

82

आगामी विधानसभेला २८८ पैकी भाजप २४ तर शिंदे गट ४८ जागा लढेल, असं वक्तव्य भाजपा चे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता भाजपचा विश्वासू मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. नेमकं काय म्हणाले महादेव जानकर? भाजपने जागा वाटप जाहीर केले आहे. त्यात आमचा विचार केलेला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाही. आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू. आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. आम्ही सध्या दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे तर दुसरा खालच्या सभागृहात आहे. आमच्याकडे ९८ जिल्हा परिषदा आहेत. तर तीन सभापतीदेखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे २८ नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे. आम्ही लोकसभेच्या पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे. तिथेच जागा मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल. तर त्यांना शुभेच्छा आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला सोबत घेतील, अन्यथा आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे. असं महादेव जानकर म्हणाले.