Home शिक्षण आजगाव येथे गीताई पठण स्पर्धा उत्साहात संपन्न..!

आजगाव येथे गीताई पठण स्पर्धा उत्साहात संपन्न..!

135

आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ, ग्रंथालय आजगाव यांचे आयोजन

सावंतवाडी: तालुक्यातील आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ आणि ग्रंथालय आजगाव आयोजित गीताई पठण स्पर्धा गीताजयंती निमित्ताने दि. २२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

 

सदर स्पर्धा लहान गट व मोठ्या गटामध्ये पार पडली.

प्रत्येक गटातील १ ते ५ क्रमांकाना बक्षिसे व सहभागाबद्दल सर्वांना शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले. सोबत आजगाव नं.१ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव स्मरणिका देखील देण्यात आली.

 

लहान गटात कु.गायत्री पुरुषोत्तम शेणई (शाळा नाणोस, जोशी-शेट्ये.) हिने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय कु. स्वरा कृष्णा गवस (शाळा आजगाव नं.१), तृतीय क्रमांक कु. आराध्या संदेश नाईक (शाळा आजगाव नं.१. ) यांनी प्राप्त केला शिवाय उत्तेजनार्थ क्रमांक कु. दक्ष विष्णू गोवेकर ( आजगाव नं.१.), कु. दत्ताराम विठोबा गावडे ( तिरोडा नं. १) यांनी प्राप्त केला.

 

मोठ्या गटात प्रथम क्रमांक कु. नमिता वामन शेणई (शाळा तिरोडा नं.१), द्वितीय कु. सर्वांगी विनोद रगजी ( तिरोडा नं.१), तृतीय कु. चैतन्य राम साटेलकर ( तिरोडा नं.१) तर उत्तेजनार्थ क्रमांक कु. आर्य ग्गजानन काकतकर (आजगाव नं.१), कु. सोनल सुनील मुळीक ( धाकोरे नं.१) यांनी मिळविला.

सर्वांचे आयोजकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

सदर स्पर्धेचे परीक्षण म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अरविंद प्रभूसाळगांवकर, प्रमोद खांडेकर यांनी केले.

या कार्यक्रमांस माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, सचिव विलास मठकर, उपाध्यक्ष सुर्यकांत आडारकर , विनायक उमर्ये (सेवानिवृत्त शिक्षक) , शाळांचे शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.