Home स्टोरी आंबोली घाटात मेलेल्या कोंबड्या, मेलेली जनावरे, मारलेल्या जनावरांची आतडी टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

आंबोली घाटात मेलेल्या कोंबड्या, मेलेली जनावरे, मारलेल्या जनावरांची आतडी टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

156
  • सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील  आंबोली हे गाव पर्यटन गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात राज्यातील आणि परराज्यातील पर्यटक भेट देत असतात. आंबोली मार्गे गोव्याला जाणारा मुख्य रस्त्यालगत आंबोली गावातुन वाहतुक करणारे पोल्ट्री व्यावसायीक व इतर जनावरे वाहतुक करणारे व्यावसायीक हे आंबोली हद्दीमध्ये मेलेल्या कोंबड्या व त्यांची विष्ठा, मेलेली जनावरे, मारलेल्या जनावरांची आतडी ही रस्त्यालगत वारंवार सूचना विनंत्या करून देखील व दंड आकारण्याबाबत सूचना करून देखील टाकत आहेत. त्यामुळे त्यांना आंबोली घाटातून वाहतूकीस बंदी करावी अशी मागणी आंबोली सरपंच यांनी पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदरच्या कृत्यामुळे आंबोलीची पर्यटन गाव म्हणून असलेली प्रतीमा मलीन होत आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनारोगराईचा त्रास होत आहे. पाळीव जनावरांमध्ये रोगराई पसरत आहे. याबाबत नेमके कोणती गाडी चारा टाकते हे निश्चित करणे प्रत्यक्ष घाण टाकताना पकडल्याशिवाय शक्य होत नाही.तरी सदर मुजोर व असंवेदनशिल व जनतेच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशाप्रकारचे कार्य करणारे पोल्ट्री व्यावसायीक व इतर जनावरे वाहतुक करणारे व्यावसायीक यांना आंबोली मार्गे वाहतुक करण्यास मज्जाव करावा जेणेकरून येथील स्थानिक ग्रामस्थांना रोगराईचा त्रास व पाळीव जनावरामध्ये पसरणारी रोगराई याबेल तरी आपण याबाबत योग्य ती कार्यवाह लवकरात लवकर करावी. अन्यथा स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेल्या असंतोषाचे रूपांतर हे एखादी चुकीची घटना घटण्यामध्ये होऊ शकते. असे निवेदनात सरपंच सौ पालेकर यांनी म्हटले आहे.