Home क्राईम आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे नेत असतांना जानू...

आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे नेत असतांना जानू फाले यांना अज्ञात व्यक्तीकडून बेदम मारहाण.

82

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबेगाव येथून आपल्या मालकीचे बैल नातेवाईकांकडे सासरवाडीला चौकुळ येथे चालत घेऊन जात असताना जानू धोंडी फाले यांना अज्ञात व्यक्तीने वाटेत अडवून बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने आंबे गावातील सर्व गाववास्य एकवटले असून सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सदर जानू फाले हे आपल्या सासरवाडीला आपल्या मालकीचे बैल नेऊन तेथे देण्यासाठी गेले होते. मात्र काही अज्ञात व्यक्तीने त्यांना रस्त्यात अडवून तुम्ही बैल का घेऊन जात आहात? अशी विचारणा करून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध झाले. सदर मारहाण झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेगाव येथे ही घटना कळल्यानंतर आंबे गावातील सरपंच शिवाजी परब सह शेकडो ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आमच्या शेतकरी बांधवाला अशी वाटेत अडवून मारहाण करणे चुकीचे आहे.  संबंधित व्यक्तींवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. असा इशारा दिला आहे. जोपर्यंत सदर व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यापासून हलणार नाही. असा निर्णय घेतला आहे.