माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ११ मार्च रोजी किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रेड्डी हे अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री होते. किरण कुमार रेड्डी आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजप हायकमांडसोबत ते संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे. भाजप नेत्यांसोबत किरण कुमार रेड्डी यांच्या बैठकाही पार पडल्याची चर्चा आहे. किरण कुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षाकडून सर्व काही मिळवले आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम केले त्यांनी आता भाजपमध्ये जावे. असे मत काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी व्यक्त केले.
Home राजकारण आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी पक्षाला...