मसूरे प्रतिनिधी: ज्ञानप्रसाद मंगल कार्यालय, ब्राह्मण आळी, जालगाव, दापोली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दाभोली, वेंगुर्ला सिंधुदुर्गचे रहिवासी व भूतपूर्व फेडरेशन शूटिंगबॉल पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री व सौ. मंजुषा दाभोलकर मेस्त्री ह्यांना दापोली कृषी विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय तोरणे (हेड डिपार्टमेंट ऑफ अग्रीकलचर ) ह्यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. संजय तोरणे म्हणाले, शूटिंगबॉल खेळात सामान्य खेळाडू म्हणून आपल्या क्रीडा जीवनाला सुरुवात करणार्या दाभोलकर सरानी फेडरेशन पंच, स्पर्धा नियंत्रक, निरिक्षक, प्रशिक्षक, आयोजक आदी विविध भूमिकाना न्याय देत शूटिंगबॉल खेळावर अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. तसेच त्यांचा शूटिंगबॉल खेळबद्दल जनजागृतीचा विशेष उल्लेख केला. आता सेवानिवृत्तीनंतरही तरुणाच्या तडफेने सर ग्रामीण शाळातील पालक व पाल्याना भेटून खेळ व शिक्षण नाण्याच्या दोन बाजू ह्या विषयावर करीत असलेल्या प्रबोधनाबद्दल विशेष कौतुक केले. ह्या कार्यक्रमाला सचिन वाघ, विजय रसाळ, देवाशिष ढवळे, वैभव ढवळे, रमाकांत शिगवण, प्रतिक शिगवण, निऱजन शिगवण, भाया बांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.