Home स्टोरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट “भेरा” २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट “भेरा” २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.

144

सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. “भेरा” चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून हा चित्रपट मालवणी भाषेत आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार दिपक जोईल (देवगड), श्रद्धा खानोलकर (कुडाळ), प्रमोद कोयंडे (देवगड), आकांक्षा खोत (म्हापण),विवेक वाळके (कणकवली), गौरव राऊळ (वेंगुर्ला) आहेत.

“भेरा”  चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रसाद खानोलकर व श्रीकांत प्रभाकर, छायांकन समीर भास्कर, ध्वनी धनंजय साठे, संकलन स्मिता फडके, पार्श्वसंगीत प्रद्युम्न चावरे आणि प्रणव जांतीकर यांनी दिले आहे. चित्रपटाचे सबटायटल्स  अजय जोशी, फेस्टिवल क्युरेटर अनिश प्रभुणे, डीस्ट्रीब्युटर कुमार गावडा, मार्केटिंग ध्यास पर्फोर्मिंग आर्ट्स यांनी केले आहे.

“भेरा’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट आहे. २८ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनपूर्वी खास कोकणातील प्रेक्षकांसाठी खास दोन शोज् फक्त आपल्या कुडाळ शहरात दि. २० फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूल, कुडाळ होणार आहेत. तिकीट दर रु. ३००/  आणि १६ वर्षाखालील मुलांना विशेष सवलत दर रु. १५० तसेच ग्रुप बुकिंग सवलत (१० किंवा त्यापेक्षा जास्त तिकीट घेतल्यास ) प्रत्येकी तिकीट रु. २५०/ असा आकारण्यात आला आहे.

कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आपल्या मालवणी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक कोकणी माणसाने हा चित्रपट आवर्जून बघणे गरजेचे आहे. आपले कोकणी मालवणी भाषा जगाच्या कानोकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी असे चित्रपट तयार होणे गरजेचे आहे. तसेच आपली मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी आणि आपल्या मालवणी भाषेचा प्रसार करणारे असे मालवणी चित्रपट  निर्मिती करणाऱ्या आपल्या कोकणी माणसांना, मालवणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मालवणी भाषेत तयार झालेले चित्रफट प्रथम आपल्या कोकणी माणसाने पाहणे आणि त्याची प्रसिद्धी करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या कुडाळ शहरात दि. २० फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे प्रदर्शनपूर्वी खास कोकणातील प्रेक्षकांसाठी खास दोन शोजपैकी एक शोज नक्की बघा आणि कोकणातील कलाकारांचे प्रोत्साहन वाढवा. तसेच आपल्या मालवणी भाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सहकार्य करा.

तिकिटासाठी संपर्क करा : 9209391117