रेकोबा हायस्कुल वायरी,प्रगत विद्यामंदिर रामगड, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे याठिकाणी करण्यात आले वह्यांचे वाटप
सिंधुदुर्ग: ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य असून त्यानुसार शिवसेना पक्ष कार्यरत आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर, वह्या वाटप, श्रमदानाचे उपक्रम असे समाजकार्य गेली ५८ वर्षे शिवसैनिक करीत असून शिवसेनेची ती ओळख आहे.
गेली १५ वर्षे कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येत आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून ध्येय निश्चित करावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण शिवसेनेच्या वतीने मालवण तालुकयातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ आज करण्यात आला. रेकोबा हायस्कुल वायरी मालवण, अंबाजी विद्यालय वायरी मालवण, प्रगत विद्यामंदिर रामगड, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर सर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे,युवतीसेना विभागप्रमुख सोनाली डिचवलकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर,ग्रा. प. सदस्य चंदना प्रभू, गौरी जोशी, ममता तळगावकर, प्रदीप वेंगुर्लेकर, शाखा प्रमुख जयवंत लुडबे, दीपक देऊलकर, उप शहरप्रमुख उमेश मांजरेकर, नाना नाईक, बंड्या लुडबे, दाजी जोशी, विश्वनाथ लुडबे, राजन लुडबे,दीपक देसाई,सिद्धेश मांजरेकर, राजू मेस्त्री, चिंतामणी मयेकर, जयदेव लोणे, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
रामगड येथे उपतालुका समन्वयक प्रशांत सावंत,विभाग प्रमुख बंडू चव्हाण, सरपंच शुभम मठकर, उपसरपंच राजेंद्र जाधव, संस्थाअध्यक्ष वासुदेव देसाई, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, सचिव विष्णू मठकर, मुख्याध्यापक श्री वळंजू सर, उपविभाग प्रमुख अमित फोंडके, महिला उपतालुकाप्रमुख रीमा पारकर, ग्रा. पं. सदस्य लक्षिता मेथर,स्वानंदी सादये, जेष्ठ शिवसैनिक सुभाष धुरी, असरोंडी उपसरपंच आदित्य सावंत, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, हेमंत पारकर,संजय परुळेकर आदी उपस्थित होते.
शिरवंडे येथे बाळकृष्ण सावंत,बंडू सावंत,मुख्याध्यापक श्री तर्फे सर, शालेय समिती अध्यक्ष चव्हाण, खजिनदार घाडीगावकर,कैलास घाडीगावकर, दशरथ घाडीगावकर यांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.