Home स्टोरी असरोंडी येथील सावंत परिवाराचा निसर्गाचा समतोल राखण्या साठी वटपौर्णिमेला झाडे लावण्याचा अनोखा...

असरोंडी येथील सावंत परिवाराचा निसर्गाचा समतोल राखण्या साठी वटपौर्णिमेला झाडे लावण्याचा अनोखा संदेश.

123

मसुरे प्रतिनिधी: प्रत्येक पतिवता वटपौर्णिमे दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या वडाच्या झाडाची फांदी तोडून तिची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी निर्माल्याच्या नावाखाली या फांदीचा अक्षरशः कचरा होतो. परंतु निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटपौर्णिमेचे औचित्य साधून असरोंडी ताटरबाव येथील सौ .विद्या संजय सावंत हे कुटुंब आपला स्वतःचा व्यवसाय असलेल्या चिरे खाणीच्या जिरे काढून रिकामी झालेल्या तळात दरवर्षी विविध प्रकारची तसेच वडाचे एक झाड लावून वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी करताना. निसर्गाचा समतोल राखण्याचा एक अनोखा संदेश सुद्धा देतात. आतापर्यंत विविध प्रकारची झाडे या कुटुंबांनी लावून पर्यावरणाचा समतोल राखलेला आहे.

यावेळी माहिती देताना सौ विद्या सावंत म्हणाल्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने व्यावसायिक पिकांची लागवड करताना पाच तरी जंगली झाडे लावणे गरजेचे आहे. तसेच वटपौर्णिमे दिवशी मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाची तोड होते यामुळे आपण सर्वांनी या दिवशी वडाचे एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. जेणेकरून तोडलेल्या वडाच्या झाडाला पुन्हा एकदा पर्यायी वडाचे झाड उपलब्ध झाल्यास निसर्गाचा समतोल ही योग्य स्थितीमध्ये राखला जाईल आणि खऱ्या अर्थाने सौभाग्यवतींचा असणारा वटपौर्णिमा हा सण सुद्धा अगदी योग्य पद्धतीने साजरा होईल असे मत व्यक्त केले.

यासाठीच हे सावंत कुटुंब मुक्काम पोस्ट असरोंडी ताटरबाव वाडी येथे असलेल्या आपल्या स्वतःच्या चिरे खाणींच्या चिरे काढून रिकामी झालेल्या तळात दरवर्षी पावसाळ्यात वटपौर्णिमेच्या अगोदर विविध प्रकारच्या झाडांची लागवड करतात आणि वटपौर्णिमे दिवशी वडाचे एक झाड लावतात. ही झाडे श्री संजय कालिदास सावंत, कुमारी सौम्या संजय सावंत, श्री सुरेश सावंत आणि त्यांचे सहकारी आणि सौ विद्या संजय सावंत चिरे खाणीच्या तळामध्ये लावतात आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा समतोल राखतात.

फक्त पतीच्या दीर्घायुष्या करता नव्हे तर संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी या सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी या वटपौर्णिमेला एक तरी जंगली झाड आणि एक वडाचे झाड लावण्याचा आपण सर्वांनी संकल्प करून येणारी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी करण्याचेही सौ विद्या संजय सावंत या कुटुंबाने आवाहन केले आहे. सौ विद्या संजय सावंत या कुटुंबाने दिलेला हा वटपौर्णिमेचा अनोखा संदेश प्रत्येक महिलेने अंगीकारला तर निश्चितच निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.