मसूरे प्रतिनिधी:“अवचिन्ह” या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी लेखक दिग्दर्शक निलेश रमेश जाधव आणि विहान थिएटर्स ची संपूर्ण कलावंतांची टीम यांनी श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले येथे स्वामींचे आशिर्वाद घेतले. यावेळी मठाचे विश्वस्त श्री. विनय कंटक, कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे यांची प्रमुख उपस्थिती होती. “अवचिन्ह” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे होणार आहे. सर्वांना या नाटकाची उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला डोळ्यासमोर ठेवून स्वामींच्या आशीर्वादाने पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. यावेळी श्री. विनय कंटक – विश्वस्त, श्री स्वामी मठ, विलेपार्ले यांनी नवीन नाटकाचा या प्रयोगाविषयी आनंद व्यक्त केला. आणि संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीकरिता आणि यशाकरिता शुभेच्छा दिल्या.
नाटकाचे लेखक-दिग्दर्शक निलेश जाधव यांनी सुद्धा एक अतिशय सुंदर अनुभव घेण्याकरिता प्रेक्षकांनी दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ नाट्यगृह, चर्नी रोड, मुंबई येथे यावे आणि भरभरून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन नाट्य प्रेक्षकांना केले आहे.
त्याचबरोबर मराठी नाट्यश्रुष्टी, रंगभूमी आणि मराठी चित्रपट श्रुष्टी यांना जिवंत ठेवण्याचे काम हे मराठी प्रेक्षकांचे आहे. सध्या मराठी रंगभूमीवर नवनवीन दिग्दर्शक, लेखक कलाकार यांच्या मार्फत नवनवीन कलाकृती निर्माण केल्या जात आहे. महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांमार्फत अनेक नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे, मराठी रंगभूमी करिता तन, मन, धनाने स्वतःला अर्पण करणारे, पण तितकेच रंगभूमीकरिता मनापासून मेहनत करणारे अनेक कलावंत असल्याचे आपणास दिसून येतात. त्याच प्रमाणे व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा अनेक सुंदर प्रयोग होताना आपणास दिसून येतात. या सर्वांवर नाट्यगृहात जावून, नाटक बघून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून, प्रेम करणे गरजेचे आहे. असे यावेळी अवचिन्ह नाटकातील उपस्थित कलाकार यांनी मत व्यक्त केले. या नाटकात निलेश रमेश जाधव, नीलमाधव कल्याण, गणेश राजेशिर्के, अनिकेत मोरे (गुड्डू), मयुरा निलेश जाधव, रेणुका इंगळे, डॉ. प्रदिप स. निंदेकर, नितीन सदानंद म्हापसेकर, अमेय हळदे, अविनाश शेवाळे, विवेक शिंदे, योगेश पाटील, विनायक निवळकर आदी कलावंत भूमिका साकारत आहेत.