नवी दिल्ली: देशाच्या शैक्षणिक परिवर्तनात युवकांचा सक्रीय सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, नॅशनल एज्युकेशन फोरम (NEF) — भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था — यांनी अमोल भगत यांची राष्ट्रीय युवा समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे.
ही गौरवशाली नियुक्ती अनु कुमारी, मुख्य राष्ट्रीय समन्वयक (Chief National Coordinator) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, डॉ. गीतांजली मुखर्जी, संयुक्त सचिव (Joint Secretary) यांच्या अनुमोदनाने निश्चित करण्यात आली आहे.
अमोल भगत हे माध्यम, युवक सक्षमीकरण आणि शैक्षणिक जनजागृती या क्षेत्रांतील एक नामांकित व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी देशभरात युवांसाठी प्रेरणादायी मोहिमा राबवून, शैक्षणिक सुधारणा प्रोत्साहित करत सक्रिय भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय युवा समन्वयक या भूमिकेतून ते देशभरातील विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि युवक संघटनांशी संवाद साधून NEF च्या समावेशक, आधुनिक आणि भविष्याभिमुख शिक्षणदृष्टीकोनाचा प्रसार करतील.
आपल्या नियुक्तीबाबत अमोल भगत म्हणाले,“ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. युवक हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना सक्षम बनवून भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.”
नॅशनल एज्युकेशन फोरम ही संस्था शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि युवक नेते यांना एकत्र आणून भारताच्या शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने कार्य करत आहे. अमोल भगत यांची टीममध्ये झालेली ही नियुक्ती NEF च्या युवा केंद्रित दृष्टिकोनाला बळ देणारी आहे.