Home स्टोरी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आता महाराष्ट्र सायबर सेलने बजावला समन्स.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आता महाराष्ट्र सायबर सेलने बजावला समन्स.

150

२५ एप्रिल वार्ता: आधीच महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आता महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. अभिनेत्री तमन्नाने २०२३ साली आयपीएलचा सामना फेअरप्ले या अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीम केल्यामुळे  व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झालं होतं. याप्रकरणी तिला २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. फेअरप्ले अ‍ॅप हे महादेव बेटिंग अ‍ॅपचीच एक सब्सिडरी आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तला २३ एप्रिल रोजी चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, संजय दत्त चौकशीला उपस्थित राहिला नाही.