Home स्टोरी अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

153

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार आहेत. ही वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे आणण्यासाठी इंग्लंडशी सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली.