Home स्टोरी अफगाणिस्तानात तालिबान आणि पाकिस्तानमध्ये ताणतणावाचे वातावरण!

अफगाणिस्तानात तालिबान आणि पाकिस्तानमध्ये ताणतणावाचे वातावरण!

113

७ सप्टेंबर वार्ता: अफगाणिस्तानात तालिबान आणि पाकिस्तानमध्ये ताणतणावाचे वातावरण आहे. बॉर्डरवर दोन्ही देश आपसात भिडत आहेत.

 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तामध्ये असलेली तोरखम बॉर्डर बंद करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. तोफ गोळ्यांचा मारा करण्यात आला. युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सैन्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थिती शांत करण्यासाठी पावल उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं ‘द खुरासान डायरी’ने म्हटलं आहे. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये तोरखम बॉर्डर सील झाली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध आता मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. अफगाणिस्तानात जेव्हापासून तालिबान सत्तेवर आहे, तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.