Home स्टोरी अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन छेडून वीज वितरणाला उत्तर देऊ – आबा चिपकरांचा...

अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन छेडून वीज वितरणाला उत्तर देऊ – आबा चिपकरांचा इशारा

305

शिरोडा: सद्य:स्थितीत वेंगुर्ला तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा सुरु असून मागील दीड ते दोन महिन्यापासून सतत विजेचा लपंडाव होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत असून त्यांच्या तब्येतीसाठी वीज वितरणाचा गलथान कारभार हानिकारक ठरत आहे. मागील काही महिने सतत दुपारी बारा ते तीन बाहेर न पडण्याचे वृत्त येत असून याच दरम्यान वीज गायब होत आहे. ज्यामुळे वयस्कर नागरिकांना व आजारी व्यक्तींना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत जनतेने विद्युत महावितरण अधिकाऱ्यांना विचारले असता पावसाच्या कामांची पूर्वतयारी सुरू आहे असे उत्तर देत टाळाटाळ करताना निदर्शनास येत आहे. बिल उशिरा भरल्यास ज्या ग्राहकांना हेच विज वितरणचे अधिकारी त्रास देतात त्यांना या उन्हाळ्यात नेमकी ग्राहकांची दया येत नाही का? असा सवाल जनतेतून होत आहे. स्वतः एसी केबिनमध्ये राहून कदाचित यांना सामान्य जनतेची व्यथा कळत नसेल आणि जर पावसाळ्याचे काम आता सुरू करत असाल तर ह्या आधी झोपला होता का? असा सवाल उपस्थित होत आहे. तरी वेळीच स्वतःला आवर घाला आणि दुपारच्या वेळेस लाईट काढणे निश्चित टाळा अन्यथा उन्हाचा त्रास सामान्य जनतेला काय होतो? हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असा सज्जळ इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार जी जी उपरकर समर्थक राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी दिला आहे.