Home Uncategorized अत्याधुनिक दर्जाच्या ‘एके-२०३’ रायफली भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल.

अत्याधुनिक दर्जाच्या ‘एके-२०३’ रायफली भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल.

108

६ जुलै वार्ता: भारतीय लष्कराच्या ताफ्यात अत्याधुनिक दर्जाच्या ३५ हजार एके-२०३ रायफली दाखल करण्यात आल्या आहेत. या रायफलीमधून एका मिनिटाला ७०० राऊंड फायर करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही कार्यकाळात संरक्षण दलाच्या मजबुतीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे. एके-२०३ श्रेणीतील ७ लाख रायफली तयार करण्याचे काम कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये सुरू आहे. २०२१ साली भारत आणि रशियात या रायफलीच्या संयुक्त भागीदारीबाबत करार झाला होता. भारत आणि रशियातील संयुक्त भागीदारीतील ‘आयआरआरपीएल’ या कंपनीने या रायफलची निर्मिती केली आहे. या कंपनीने या असॉल्ट रायफलींची डिलव्हरी भारतीय लष्कराकडे केली आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत या रायफलींची निर्मिती २०२१ पासून करण्यात आली आहे.

एके-२०३ रायफ वजनास हलकी आहे. एके-२०३ रायफल चे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही रायफल कोणत्याही ऋतुत कधीच जाम होत नाही. एका मिनिटात ७०० गोळ्या फायर करण्याची क्षमता या रायफलची आहे. रशियन कंपनीसोबत केलेल्या भागीदारीनुसार पहिल्या टप्प्यातील रायफलनिर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. एके-२०३ सीरिजमधील असॉल्ट रायफलची निर्मिती करणारा भारत हा पहिला देश बनला आहे.