Home स्टोरी अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे! शरद पवार...

अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका….

181

७ ऑगस्ट वार्ता: अजित पवार यांनी राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षनावावर त्यांनी दावा केला. ३० जून २०२३ त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यामध्ये आम्हालाच पक्ष चिन्ह आणि नाव देण्याची मागणी केली होती. आमचा पक्षच खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा करत त्यांनी आमदारांची प्रतिज्ञापत्रे जोडली होती. आयोगाकडे ही याचिका असताना शरद पवार गटही केंद्रीय निवडणूक आयोगात पोहचले आहे. शरद पवार गटाने अजित पवार यांनी दाखल केलेली याचिका अकाली आणि दुर्भाग्यपुर्ण आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा उल्लेख नाही, किंवा तसा पुरावाही त्यांच्याकडे नाही, यामुळे अजित पवार गटाने केलेली मागणी फेटाळा, असे शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.