Home स्टोरी अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

113

पारंपारिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन.

नाताळ व शासकीय सुट्टया नूतन वर्ष पर्वावर वटवृक्ष मंदिरात होणार भाविकांची मांदियाळी

मसुरे प्रतिनिधी:

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. २३ डिसेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक १ जानेवारी २०२४ अखेर शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती तसेच नूतन वर्षाचे पर्व इत्यादी मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता असंख्य भाविक स्वामींच्या दर्शन भेटीस येणार आहेत. वटवृक्ष मंदीरात स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करीता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ, प्रसाद मिळेल. दत्त जयंती निमित्त भांडूप, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, पुणे, रत्नागिरी इत्यादी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय मैंदर्गी रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दिनांक २६ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दत्तजन्म आख्यान वाचन, व भजन करून सायंकाळी ६ वाजता हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल.

दत्त जयंती रोजी भक्त निवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ यावेळी देण्यात येईल. बुधवार २७ डिसेंबर रोजी दुपारी ११:३० च्या नैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करणेत येईल. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक भजन, दिंड्या व वाद्यांसह पार पडणार आहे.

अक्कलकोट शहरातून या पालखी सोहळ्याचा मार्ग सालाबादप्रमाणे वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठ समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे रात्री ९:३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा पालखी सोहळा दर्शनाचा कीर्तनसेवेचा व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.