सिंधुदुर्ग : S.R.Y Film Production ची संभ्रम या वेब सीरिजचा पहिलाच टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संभ्रम या वेब सीरिज च संपूर्ण चित्रीकरण कोकणातील, सावंतवाडी आणि सावंतवाडी मधील आजू बाजूच्या गावात झालं होतं.
नुकताच या वेब सीरिज चा पहिला टिझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. हा पहिला च टिझर असून , कालांतराने , प्रत्येक मनातील भ्रम उलघडत जाणारे वेगवेगळे टिझर, आणि ट्रेलर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझर पाहता, त्यात प्रेम कथा आणि त्यात असणारे अडथळे दिसून येत आहे. आता यात कोणकोणते भ्रम ,आणि रहस्य निर्माण होते ते लवकरच आपल्याला कळेल. कोकणातील सागर गोसावी हे या सीरिज चे डायरेक्टर असून ,रमेश भेकट यांनी उत्तमरीत्या कथेची बांधणी केली आहे.