९ जून वार्ता: अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी (MHT CET) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल सोमवार दि. १२ जून रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.