Home स्टोरी ISRO द्वारे चांद्रयान-३ मोहिमेची तयारी पूर्ण!

ISRO द्वारे चांद्रयान-३ मोहिमेची तयारी पूर्ण!

142

६ जुलै वार्ता: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान-३ मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान-३ रॉकेटच्या वरच्या भागात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर ते असेंबलिंग युनिटमध्ये नेण्यात आले आहे आणि GSLV-MK-3 रॉकेटला जोडण्यात आले आहे. चांद्रयान-३ ही देशाची सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आहे. तसेच भारतासाठी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे. चांद्रयान-३ ही १२ ते १९ जुलै दरम्यान प्रक्षेपित होणार आहे. त्याच्या संभाव्य प्रेक्षेपणाची तारीख १३ जुलै असल्याचे सांगितले जात आहे. ISRO हे चांद्रयान-3 आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करणार आहे. या मिशनसाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे