Home शिक्षण ISO मानांकित, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा...

ISO मानांकित, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट .

121

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव सन्माननीय रणजितसिंह देवोल, मा.महेश पालकर शिक्षण संचालक पुणे (योजना) आणि राज्य प्रकल्प संचालक सन्माननीय श्री.कैलास पगारे सर (भा.प्र.से.) यांनी ISO मानांकित, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला सदिच्छा भेट दिली. आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील अग्रमानांकित, उपक्रमशील, विविध पुरस्कार प्राप्त गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ ला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव सन्माननीय श्री देवोल सर आणि राज्य प्रकल्प संचालक सन्माननीय श्री.पगारे सर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांच्या सोबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माननीय श्री.मुश्ताक शेख सर होते.यावेळी सन्माननीय सचिव महोदयांनी शाळेच्या प्रत्येक वर्गात जाऊन पहाणी केली. शिक्षकांकडून राबविलेले विविध उपक्रम, शासनाकडून प्राप्त शैक्षणिक साहित्याचा वापर, इ- लर्निग, डिजिटल शिक्षण आणि शाळेने साधलेली नेत्रदीपक प्रगती यांची माहिती करून घेतली. शिक्षकांना व शाळेला मिळालेले पुरस्कार, विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरापर्यंतचा यशस्वी प्रवास सरांनी जाणून घेतला. सर्व शिक्षकांनी सरांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

शाळेचा स्वच्छ व सुंदर परिसर न्याहळत मान्यवरांनी खूप समाधान व्यक्त केले. सुंदर व भव्य प्रवेशद्वार, अद्ययावत संगणक कक्ष, गुणी व अभ्यासू विद्यार्थी, विविध आदर्शवत उपक्रम, उत्कृष्ट मार्गदर्शक लाभलेले केंद्र प्रमुख, सक्षम शाळा व्यवस्थापन समिती आणि उपक्रमशील, हुशार, प्रामाणिक, कार्यक्षम, शिक्षकवृंद पाहून सन्माननीय देवोल सरांनी राज्यातील एक सुंदर शाळा पहायला मिळाल्याचे गौरवोद्गार काढलेत. यावेळी मान.गटशिक्षणाधिकारी श्रीम.बोडके मॅडम, केंद्र प्रमुख श्रीमती लंगवे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर, शाळेचे शिक्षक श्री केशव जाधव, श्रीमती लक्ष्मी धारगळकर, श्रीमती कविता धुरी, श्रीमती प्रणिती सावंत, श्री अमर पाटील, श्रीमती सुजाता पवार आणि सर्व शिक्षा चे स्वप्निल सर उपस्थित होते.