लांजा प्रतिनिधी: श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली चे D.J. सामंत स्कूल, लांजा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अनेक विध्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये भाग घेतला. क्रिडा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज मोबाईलच्या दुनियेत अनेक विद्यार्थी मोबाईल मध्ये हरवले आहेत. तसेच त्यांना मोबाईलचे व्यसन लागले आहे असे दिसून येते. त्यामुळे साहजिकच आज मुलांचा व्यायाम कुठेतरी कमी पडत आहे. कारण मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलं बाहेर पडत नाहीत. एवढंच नाही तर अति मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये अनेक शारीरिक आजार निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे. असं असतांना D.J. सामंत स्कूलच्या वतीने क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी लहान मुलांसाठी खूपच प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण होता. आज खऱ्या अर्थाने मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि हेच काम D.J. सामंत स्कूलच्या सर्व शिक्षक व सभासद यांनी केले. जो निकोप शरीर आणि मनाचा समतोल राखतो. व्यक्तिमत्त्व विकास, खिलाडू वृत्ती, अपयश पचविण्याची ताकद ही ह्या खेळांमुळे च निर्माण होत असते. यावेळी मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते.
ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा पोलीस निरीक्षक मा. श्री. निळकंठ बगळे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लांजा, मा. मैंदाड मॅडम, मा.भुजबळ मॅडम देवधे हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक तथा क्रीडाशिक्षक श्री. सुशांत राईन सर, स्कूल च्या कार्यकारिणी सदस्या मा. सौ. समिक्षा कामत मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. उपाध्ये सर, प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका कु. तेजस्विनी, वैभवी विरेंद्र आचरेकर मॅडम तसेच शिक्षकवृंद उपस्थित होता.