Home स्टोरी BSNL 4G टॉवरसाठी ना हरकत दाखला न मिळाल्यास शशांक माने यांचा उपोषणाचा...

BSNL 4G टॉवरसाठी ना हरकत दाखला न मिळाल्यास शशांक माने यांचा उपोषणाचा इशारा!

290
संग्रहित छायाचित्र

मालवण: मालवण तालुक्यातील महान गावात BSNL 4G टॉवर मंजूर असून त्या करीता लोकांकडून जमिन BSNL साठी दिली जाणार आहे. त्यासाठी शशांक माने यांनी महान ग्रामपंचायत कडे ना हरकत दाखल्याची मागणी केलेली आहे. परंतु महान ग्रामपंचायतकडून ना-हरकत दाखला देणेस टाळाटाळ झालेली आहे. तसेच शशांक माने यांनी दिलेल्या अर्जा प्रमाणे ना-हरकत दाखला नाकारला गेला.

सदर ना-हरकत न मिळाल्यास BSNL कडील लाभ मिळणार नाही. त्यामुळे दि. २७ जून २०२३ पर्यंत लेखी निर्णय कळवावा अशी मागणी शशांक माने यांनी केली आहे. दि. २७ जून २०२३ पर्यंत नाहरकत दाखला न मिळाल्यास २८ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत महान समोर सकाळी १० वाजता उपोषण करणार असल्याचा इशारा शशांक माने यांनी दिला आहे. याबाबत शशांक माने यांनी मा. तहसीलदार मालवण, मा. पोलिस निरीक्षक मालवण, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण, मा. उपविभागीय अभियांत भारत संचार निगम लि मालवण, महसूल सहाय्यक तहसिल कार्यालय आणि मालवण पोलीस ठाणे निवेदनाद्वारे कळविले आहे.

संबंधित निवेदन